मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत येथील महिलेच्या खून प्रकरणात अप्पर सत्र न्यायालय वसमत यांनी आरोपी पतीसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावली आहे.
वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत 13 सप्टेंबर 2023 रोजी आरोपी अब्दुल रहेमान गुलाब रहेमान, आरेफ गुलाम अहेमद व इतर यांनी फिर्यादी महमद खलील महमद शिकुर यांची मुलगी व आरोपी अब्दुल रहेमान याची पत्नी सलमा हिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन पैशाची मागणी करून तिचा गळा दाबून खून केला होता.
त्यावरून हट्टा पोलीस ठाण्यात गुरनं. 279 / 2018 कलम 498 (अ) 302, 34 भादंवि अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. आर. धुनणे, यांनी कसोशीने पूर्ण करून सबळ पुरावे हस्तगत करून गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध अप्पर सत्र न्यायालय वसमत यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
तद्नंतर आरोपी अब्दुल रहमान गुलाब रहेमान, आरिफ गुलाम अहमद यांच्याविरुद्ध अप्पर सत्र न्यायालय वसमत येथे खटला चालला.
ज्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील दासरे व नायक यांनी सरकार पक्षातर्फे योग्य युक्तिवाद केला.
आरोपी अब्दुल रहेमान गुलाब रहेमान, आरेफ गुलाम अहेमद यांनी खुनाचा गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालय क्र. 1 वसमत नगर जयंत नी. राजे यांनी 18 सप्टेंबर 2023 रोजी दोषी ठरवून आरोपीस जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके यांनी वेळोवेळी दिलेल्या विशेष सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक सी.ए. कदम, पोलीस हवालदार बेटकर, पोलीस शिपाई पतंगे यांनी योग्य मार्गदर्शन करून काम पाहिले.