Marmik
Hingoli live

24 सप्टेंबर रोजी सेनगाव, सिद्धेश्वर येथे धरणग्रस्तांची महत्त्वाची बैठक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर, मनोज जयस्वाल :-

सेनगाव, औंढा नागनाथ – जिल्ह्यातील ईसापूर धरण, सिध्देश्वर धरण, येलदरी धरणातील बाधित धरणग्रस्तांची दि.२ ऑक्टोबर २०२३ रोजी हिंगोली येथे भव्य धरणग्रस्त हक्क परिषद होणार आहे.या परिषदेच्या पुर्व तयारी निमित्त सिध्देश्वर आणि येलदरी प्रकल्पातील बाधित धरणग्रस्तांची उद्या दि.२४ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी सकाळी ११ वाजता सेनगाव आणि दुपारी ३ वाजता सिध्देश्वर येथे बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीस धरणग्रस्त व विस्थापित समस्यांचे अभ्यासक ॲड.सचिन नाईक आणि धरणग्रस्त विकास संघर्ष समिती जि.हिंगोली चे ॲड.रवि शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीस धरणग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ हराळ, प्रा.गणपत गडदे, दत्तराव नाईक, बाबूराव पोले, ह.भ.प.संभाजी महाराज दुधाळेकर, ह.भ.प.विठ्ठलराव महाराज जोडनर, प्रकाशराव पोले ,भास्करराव पोले, शरद पोले, धुळबाराव नाईक, अवधूतराव नाईक, पंकज होडबे, कैलासराव चिलगर,

गणेशराव चिलगर, गजानन खुडे, अंकुश राठोड, भगवान जाधव, सुभाष सापनार, छत्रपती गडदे, दिपक शिंदे, नानाराव थिटे, अशोक हाके, परमेश्वर घुगे,विलास काळे, अशोक राठोड, धम्मानंद शेजूळे, प्रेम चव्हाण, अशोक इंगळे, भरत थोरात, वसंत जाधव, उध्दव सानप, संदीप पोले, महेश पोले, गंगाधर मस्के, विनोद मस्के, लिंबाजी राठोड, ज्ञानेश्वर मकोडे यांच्यासह धरणग्रस्त विकास संघर्ष समिती जि.हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

अखेर हिंगोलीकरांच्या आंदोलनाला यश! मुंबईसाठी हिंगोलीहुन साप्ताहिक रेल्वे धावणार

Gajanan Jogdand

नवसाला पावणारी नांदुरा येथील आई सटवाई

Gajanan Jogdand

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे उद्घाटन ; देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे – केशव शेकापूरकर

Santosh Awchar

Leave a Comment