Marmik
Bhoomika महाराष्ट्र

प्रसार माध्यमांची शोभा करणारे तोंडघशी…

फोर्थ पिलर – गजानन जोगदंड

राज्यातील सत्ताधारी पक्षातील एका माजी खासदाराचा उघडा – नागडा व्हिडिओ आणि त्याचे संभाषण राज्यातील एका वृत्तवाहिनीने दाखविले होते. या वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 72 तासांची बंदी घालण्यात आली पण सदरील बंदी आदेशाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. यामुळे प्रसारमाध्यमांची शोभा करणारे अपसुखच तोंडावर पडले …

किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील प्रकाराने प्रसार माध्यमांना काही नीती मूल्य आहेत की नाही ही बाब पुढे करून राजकीय पुढाऱ्यांच्या नीती मूल्यांकडे मात्र कदापिही डोळेझाक करता येणार नाही. कारण ते उधळपट्टी करत असलेला पैसा हा जणतेचा आहे आणि आजच्या घडीला तर नीती मूल्यावर कोणीही बोलूच नये. ते अपसुकाच पायदळी तुडवले जात आहेत…

महाराष्ट्रात भाजपा पक्ष विरोधात असताना राज्याच्या सरकारातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बेजार करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हेही धुतलेल्या तांदळाप्रमाणे नाहीत हे बीजेपी सरकार सत्तेत आल्यानंतर एका वृत्तवाहिनीने व्हिडिओ दाखवून दिला.

या व्हिडिओ मध्ये बीजेपीचे ते माजी खासदार महोदय एका पंचतारांकित हॉटेल मध्ये उघडे – नागडे आणि काही अश्लील संभाषण करत असल्याचे व्हिडिओ त्या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते.

या प्रकाराने प्रसार माध्यमांच्या नीती मूल्यांवरही सामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र सदसद विवेक बुद्धीवाल्यांचा आवाज बहुतांश केवळ पाहणाऱ्या जनतेपुढे क्षीण झाला.

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. तो दिल्लीतील नेत्यांनीही पाहिला नसेल हे कशावरून? असे काही झाले की राजकीय पुढारी आणि काही समाजातील व्यक्तीही प्रसार माध्यमांच्या नीती मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते करणे उचितच कारण प्रसारमाध्यमांनीही आपली पातळी सोडता कामा नये.. असे असले तरी संबंधित खासदार हे महाराष्ट्रातील तत्कालीन विरोधात असलेल्या पक्षातील पुढार्‍यांचे भ्रष्टाचार काढण्यात माहीर आहेत.

मग अशा या ‘वलयांकित’ चेहऱ्याच्या पाठीमागे आणखी किती चेहरे आहेत. याचे व्हिडिओ दाखवून संबंधित वृत्तवाहिनीने त्यांचा टीआरपी वाढवला.. याने प्रसारमाध्यमांच्या नीती मूल्यांवर आक्षेप घेणाऱ्यांनी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या या अशा वागण्यावरही आक्षेप घ्यायला हवा.

कारण केवळ एकाच नीतिमूल्य दाखवून सामाजिक स्वास्थ्य जपता येणार नाही नीती मूल्य सर्वांनाच जपता आली पाहिजेत आणि विशेष बाब म्हणजे जनतेच्या पैशाची कदर व्हायला हवी.. राज्यातील शासकीय शाळा विक्री काढल्या जात आहेत… त्यांचे खाजगीकरण केले जात आहे तसेच काही कंपन्यांचे भले करण्यासाठी शासकीय नोकऱ्याही कंत्राटी पद्धतीने करण्याचे अवलंबिल्या जात आहे… यावरही आपली नैतिकता दाखवावी.

केवळ रस्त्यांची निर्मिती तेवढी होऊ लागली आहे.. उद्योगांचे काय? परभणी, हिंगोली मराठवाड्यातील या मागासलेल्या जिल्ह्यात एक तरी मोठा उद्योग आहे काय याचेही उत्तर द्यायला हवे… मागील काही वर्षात सर्वात आधी नीती मूल्य पायदळी तुडवल्या गेले ते राजकीय पुढार्‍यांकडूनच…

आपल्याला पाहिजे तशाच बातम्या प्रकाशित झाल्या म्हणून देशातील काही प्रसार माध्यमांना जणू दत्तकच घेतले आहे अशी शंका येऊ लागली आहे…

प्रसार माध्यम कुठलेही असो त्यांनी भारतीय लोकशाहीतील त्यांचे स्थान कायम टिकवले पाहिजे. तसेच प्रसार माध्यमांच्या नीती मूल्यांवर आक्षेप घेणाऱ्यांनीही त्यांच्या चौकटीत आणि त्यांची नीती मूल्य जपली पाहिजेत…

संबंधित वृत्तवाहिनीवर घातलेली बंदी ही राजकीय आकसापोटी घातली गेली आहे असेच वाटते आणि आकस बुद्धीने प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करणे हे लोकशाही सामाजिक व्यवस्थेस पोषक नाही…

या प्रकरणात संबंधित वृत्तवाहिनीचे संपादक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सदरील बंदीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचे समजते..

Related posts

आरटीई कायदा व शासन आदेशांचे उल्लंघन करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा ; विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची मागणी

Santosh Awchar

सरकारी कार्यालयात प्रीपेड स्मार्ट मीटरिंग चे काम प्राधान्याने हाती घ्या; ऊर्जा मंत्रालयाच्या वीज वितरण कंपन्यांना सूचना

Gajanan Jogdand

तोष्णीवाल महाविद्यालयाच्या एआरटीएम इंग्लिश स्कूलचा बाजारू ‘करिक्युलम’, निवेदन देऊनही गटशिक्षणाधिकारी कारवाई नाही!

Gajanan Jogdand

Leave a Comment