मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यातील भानखेडा येथे 27 सप्टेंबर रोजी स्व. किसनराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राज्यातील प्रसिद्ध ह. भ. प. सोपान महाराज सानप (शास्त्री, वेलतुरा) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी स्व. किसनराव मोलाजी देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त 27 सप्टेंबर रोजी हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सहभोजन देखील ठेवण्यात आले आहे.
राज्यातील प्रसिद्ध ह. भ. प. सोपान महाराज सानप (शास्त्री, वेलतुरा) यांचे रात्री 8 ते 10 या वेळेत कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर हरी जागर होणार आहे. सहभोजन दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बाबुराव देशमुख, देविदास देशमुख बापूराव देशमुख, रामदास देशमुख, गजानन देशमुख, नारायण देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.