Marmik
Hingoli live लाइफ स्टाइल

जनतेतील देव माणूस आमदार संतोष बांगर यांनी चिंतामणी गणपती मंदिरात स्वतः झाडू घेऊन केली स्वच्छता

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – मराठवाड्यात नवसाला पावणारा अशी खाती असलेला हिंगोली येथील श्रीचिंतामणी गणपती मंदिरात माणसातील देव असणारे तसेच जनसामान्यांच्या सुख,दुःखात धावून जाणारे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता केली.

हिंगोली येथील श्रीचिंतामणी गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्व दूर ख्याती आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथे मोदकोत्सव साजरा केला जातो.

सदरील मोदक हे नवसाचे असतात नवसाचे मोदक घेण्यासाठी राज्यातील विविध भागातून भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्री चिंतामणी चे दर्शन घेतात आणि आपली मनोकामना व्यक्त करून मोदक घेऊन जातात.

चिंतामणीच्या दर्शनासाठी यंदा मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाविक भक्तांकडून अनावधानाने केरकचरा फेकला जातो. त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता पसरते.

सदरील बाब लक्षात घेऊन माणसातील देव माणूस म्हणून ओळखले जाणारे तसेच सर्वसामान्यांच्या सुख,दुःखात कधीही धावून जाणाऱ्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी 28 सप्टेंबर रोजी स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. त्यांच्या या स्वच्छतेने सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानासही महत्त्व आले आहे.

तसेच आलेल्या भाविक भक्तांना स्वतः प्रसादाचे वाटप केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मंदिर कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Related posts

आमदार संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी पुजारी व पुरोहित घालणार श्रीनागनाथला साकडे

Santosh Awchar

मार्मिक महाराष्ट्राच्या वृत्तानंतर हळद सात हजाराच्या पुढे सरकली

Santosh Awchar

लग्नपत्रिकेवरून दिला ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश, साबळे परिवाराचे परभणी जिल्ह्यात कौतुक

Gajanan Jogdand

Leave a Comment