Marmik
Hingoli live

29 लाख 78 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 30 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबवून फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यावेळी 29 लाख 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. आतापर्यंत दोन कोटी 48 लाख 8 हजार 892 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे.

हिंगोली येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

या अनुषंगाने 30 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील एकूण पाच गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने व नगदी असे किमती 7 लाख 53 हजार रुपये, 24 वाहने किंमत 19 लाख 13 हजार रुपये, 24 मोबाईल फोन किंमत दोन लाख 95 हजार रुपये व इतर मुद्देमाल 17 हजार 500 असा, एकूण 29 लाख 78 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून आतापर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण 2 कोटी 48 लाख 8 हजार 892 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस हवालदार सुनील अंभोरे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पडली.

भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.

Related posts

हिंगोली दसरा महोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

Santosh Awchar

औंढा नागनाथ तालुक्यात कोतवाल पदासाठी भरती; अर्ज सादर करण्याचे आवाहन  

Santosh Awchar

मार्मिक महाराष्ट्र समूहाकडून ज्योती दोडगांवकर यांचा सत्कार, पोलीस होण्याचे लहानपणीचे स्वप्न विवाहानंतर प्रत्यक्ष साकारले!

Santosh Awchar

Leave a Comment