मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील खडकपुरा भागातील ह.मु. देवडा नगर येथील आरोपी हर्ष उर्फ यश अंबादास आठवले याने शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. सदरील प्रकरणी या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. माने – गाडेकर सत्र न्यायालय हिंगोली यांनी तीन वर्षाची सक्त मजुरी व 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
हिंगोली येथील खडकपुरा भागातील ह. मु. देवडा नगर येथील आरोपी हर्ष उर्फ यश अंबादास आठवले यांनी फिर्यादीची अल्पवयीन पीडित मुलीस 14 जुलै 2021 रोजी पळवून नेऊन तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आजम कॉलनी रोडकडील रामाकृष्ण हॉटेलच्या समोरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत येऊन तिला चापटाने मारहाण करून तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, अशा आशयाची फिर्याद पिढीतेच्या आईने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
यावरून भादंविच्या विविध कलमान्वये तसेच भादंविसह कलम 4, 8, 12 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अन्वय गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग हिंगोली यतीश देशमुख यांनी केला.
या प्रकरणात न्यायालयात विशेष खटला क्रमांक 38 / 2021 देण्यात आला. सदर प्रकरण हे हिंगोली अप्पर सत्र न्यायाधीश एस. एन. माने – गाडेकर यांच्यासमोर चालले.
सदर प्रकरणात सहा. सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी 13 साक्षीदार तपासले प्रकरणात पीडिता व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
अप्पर सत्र न्यायाधीश एस. एन. माने – गाडेकर जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली यांनी 30 सप्टेंबर रोजी विशेष खटला क्र. 38 / 2021 महाराष्ट्र शासन विरुद्ध हर्ष आठवले या प्रकरणात आरोपी हर्ष उर्फ यश अंबादास आठवले यास कलम 363 व 506 भादवि अन्वय दोषी ठरवून या दोन्ही कलमा अंतर्गत तीन वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम 323 मध्ये सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास 15 दिवस कारावास तसेच कलम 8 व 12 बाल लैंगिक अत्याचार कायदा या दोन्ही कलमा अंतर्गत प्रत्येकी तीन वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, अशा प्रकारची शिक्षा सुनावली.
तसेच सर्व शिक्षा सोबतच भोगावि असा निर्णय दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एन. एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. त्यांना सहकार्य सहकारी वकील एसडी कुठे व सविता एस. देशमुख यांनी केले.
कोर्ट पैरवी फेरोज शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व सुनीता एस. देशमुख मपोहे यांनी सहकार्य केले.