Marmik
News क्राईम

हृदयद्रावक: मुला देखत पित्याने केला आईचा खून! मुलगा अत्यावस्थ!! इसापूर रमणा येथील घटना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – तालुक्यातील ईसापुर रमना येथे 2 ऑक्टोबर रोजी मुला देखत पित्याने या मुलाच्या आईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना घडल्याचे समजते. सदरील घटना पाहून मुलगा अत्यावस्थ झाल्याची माहिती ही समजते.

हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ईसापुर रमणा येथे 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका पतीने त्याच्या 40 वर्षीय पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघून खून केल्याची घटना घडली. ही घटना काही वेळातच गावभर पसरल्याने सदरील घटना बघण्यासाठी या घरासमोर मोठी गर्दी जमली होती.

या गर्दीचा फायदा घेऊन मृत पावलेल्या महिलेचा आरोपी पती नाव (माहित नाही) गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. आरोपी पती हा मध्य प्राशन करत असल्याने त्यांच्यात वाद झाला असावा असे समजते.

सदरील घटना घडल्याची माहिती कोणीतरी बासंबा पोलीस ठाण्यात कळविली. त्यानंतर बासंबा पोलीस ठाण्याचे फौज फाटा येथे जमा होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाला.

अखेर 3 ते 4 वाजेच्या सुमारास आरोपी पती हा अंभेरी शिवारातील एका आखाड्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आखाडा गाठून आरोपीस ताब्यात घेऊन बसंबा पोलीस ठाण्यात नेल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

दरम्यान, घटना घडली तेव्हा या पती-पत्नीचा वीस वर्षाचा मुलगा तेथे हजर होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईची निर्घृण हत्या झाल्याचे पाहून तो अत्यावस्त झाला आहे. त्यास रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहितीही समजते.

Related posts

मोक्कातिल तीन फरार आरोपी अटकेत

Santosh Awchar

आषाढ एकादशी : श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळास पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Gajanan Jogdand

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने अँथे – 2024 केले लाँच

Gajanan Jogdand

Leave a Comment