मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे अज्ञात पाच दरोडेखोरांनी फिर्यादीच्या गळ्याला विळा लावून जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित प्रकार आखाडा बाळापूर पोलिसांच्या सतर्कतेने उधळला. यावेळी पोलिसांनी या दरोडेखोरांसह तीन म्हशी, टेम्पो असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सतर्कपणे पेट्रोलिंग करण्याबाबत देखील सूचना देतात. या अनुषंगाने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत बाळापूरचे पोलीस पथक सतर्कतेने पेट्रोलिंग करत होते.
3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री कळमनुरी तालुक्यातील बोथी या गावी अज्ञात पाच दरोडेखोरांनी फिर्यादी सुधाकर यशवंतराव बर्गे (वय 54 वर्ष व्यवसाय शेती, रा. बोथी) यांच्या म्हशीच्या आखाड्यावर येऊन त्यांच्या गळ्याला विळा लावून तीन मशीन जबरीने पिकअप मध्ये भरून चोरून नेत होते. सदरची माहिती फिर्यादीने तात्काळ बाळापूरचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांना दिली.
या अनुषंगाने बाळापूरचे पेट्रोलिंग पथक चोरट्यांचा माघ काढत काढत जाऊन दाती पाटी येथे तीन चोरट्यांना पिकपसह पकडले. मात्र उर्वरित दोन चोरटे प्रसार झाले होते.
या परिसराची तात्काळ नाकाबंदी करून तसेच तांत्रिक मदत घेऊन बाळापुर पोलीस पथकांनी पहाटे – पहाटे उर्वरित दोन चोरट्यांनाही पकडले वामन शामराव गरसुळे (वय 23 वर्षे रा. गडळ ता. कंधार जि नांदेड) विलास बालाजी शमगिरी (वय 20 वर्ष रा. वने पिंपळगाव ता. लोहा जि. नांदेड), राजू भरत सोळंके (20 वर्ष रा. कुरळा ता. कंधार जि. नांदेड), अमोल विश्वनाथ पळसकर (रा. अंजनवाडी ता. पालम जि. परभणी) अशी आरोपींची नावे असून इतर दोन विधी संघर्ष ग्रस्त बालक आहेत.
पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींविरुद्ध भादंवि 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बाळू चोपडे हे अधिक तपास करत आहेत.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना, पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत संदिपान शेळके, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवजी बोंडले, बाळू चोपडे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रामा सुब्रवाढ, पोलिस अंमलदार शेषराव जोगदंड, रामदास ग्यादलवाड काळजी वानोळे, प्रवीण चव्हाण, शिवाजी पवार, होमगार्ड गायकवाड व बोथी येथील गावकरी यांची मदत मिळाली.
तसेच सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिसांमलदार दत्ता नागरे यांनी तांत्रिक सहाय्य पुरवले. पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस पथकाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.