Marmik
Hingoli live

माजी सैनिकांच्या अडचणीचे प्राधान्याने निराकरण करण्यात येईल – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – कारगील युध्दात भारतीय सैन्य दलाने आपले शौर्य दाखवून दिले आहे. या युध्दात हुतात्मा पत्करलेल्या सैनिकांना सलाम करुन श्रध्दांजली अर्पण करीत आहे, असे सांगून माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांच्या काही अडचणी असल्यास त्याचे प्राधान्याने निराकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आज शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा गौण खनिज अधिकारी रविंद्र मारबते, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुरेश भालेराव, केशव भडंगे, कडूजी टापरे, चंदू टिपरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, आपल्या देशासाठी अनेक जवान शहीद झाले आहेत. त्या सैनिकांच्या कायम ऋणात राहण्यासाठी माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांच्या अडचणी प्रशासनातर्फे प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे सांगितले.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता.

भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा, माजी सैनिकांच्या विधवा यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

परंतु यावर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ची शासकीय सुट्टी असल्याने आज शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुरेश भालेराव यांनी दिली.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वीर जवान व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी  दुसऱ्या जागतिक महायुध्दातील माजी सैनिक विधवा, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा उपस्थित होते.

Related posts

कळमनुरी तहसीलदारांच्या विरोधात निराधार अपंग महिलांचे बेमुदत अमरण उपोषण ! कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आश्वासन

Gajanan Jogdand

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे निमित्त हिंगोली येथे धनगर समाजाची बैठक

Gajanan Jogdand

आमदार मुटकुळ्यांच्या मतदारसंघात शिक्षणाचा काळाबाजार! एआरटीएम इंग्लिश स्कूलकडून सीबीएसईच्या नावाखाली पालकांना गंडवण्याचे काम जोमात सुरू

Gajanan Jogdand

Leave a Comment