मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवार पेठ येथून 9 ऑक्टोबर रोजी 5 किलो 530 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका व्यक्तीवर एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 9 ऑक्टोबर रोजी वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीतील शुक्रवार पेठ येथे
इसम नामे मकदूम कुरेशी मोहम्मद साब कुरेशी (रा. शुक्रवार पेठ वसमत) हा त्याच्या राहते घरी स्वतःच्या फायद्यासह विनापरवाना बेकायदेशीररित्या प्रतिबंधित गांजाचा अपव्यापार करण्यासाठी गांजा स्वतः जवळ बाळगून आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राहुल महीपाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश सोनटक्के, पोह केशव गारोळे, शंकर हेंद्रे, संदीप चव्हाण,
आनंद गव्हाणे यांच्यासह माहिती मिळालेल्या ठिकाणी पंचासमक्ष छापा मारून या इसमाच्या ताब्यातून 5 किलो 530 ग्रॅम वजनाचा (किंमत 89 हजार 950 रुपये) गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नमूद आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.