मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील दसरा महोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये वाहतुकीत बदल केला आहे.
14 ते 25 ऑक्टोबर या दरम्यान दुर्गा देवी उत्सव व सार्वजनिक दसरा महोत्सव निमित्त हिंगोली शहरात प्रदर्शनी, रामलीला, भरत भेट, दुर्गादेवी विसर्जन, विविध खेळ तसेच इतर पाहण्यासाठी ग्रामीण भागातून व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. तेव्हा हिंगोली शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
तसेच चेंगराचेंगरी शहरात व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांवर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 25 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीत पुढील प्रमाणे अधिसूचना काढून बदल केला आहे.
वाहतूक व जड वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
नांदेड नाका ते महात्मा गांधी चौक कडे जाणारी जड वाहने पूर्णपणे बंद. खटकाळी बायपास येथून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद.
अकोला बायपास वाशिम कडून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद. जवळा पळशी कडून हिंगोली शहरात येणारी सर्व जड वाहने पूर्णपणे बंद.
इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक ऑटो तसेच चार चाकी वाहने पूर्णपणे बंद.
खुराणा पेट्रोल पंप ते महात्मा गांधी चौक तसेच इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक तसेच अंबिका टॉकीज ते महात्मा गांधी चौक रस्त्याने ऑटो तसेच चार चाकी वाहने पूर्णपणे बंद.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
औंढा नागनाथ कडून येणारे व वाशिमला जाणारे जड वाहने नांदेड नाका मार्गे बायपासने जातील. कळमनुरी ते वाशिम येणारे व जाणारे जड वाहने येतील व जातील.
वाशिम ते परभणी येणार व जाणारे जड वाहने बायपास नांदेड नाका मार्गे येतील व जातील. कळमनुरी ते औंढा नागनाथ येणारे व जाणारे जड वाहने नांदेड नाका मार्गे येतील व जातील शहरातील चार चाकी वाहने संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पार्किंग करतील, मुख्य बाजारपेठेत जाणार नाही.
जवळा पळशीकडून येणारे व जाणारे चार चाकी व प्रवासी वाहने अंबिका टॉकीज ते जुने नगरपरिषद चौक येतील व जातील.
याप्रमाणे 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत दुर्गादेवी उत्सव व सार्वजनिक दसरा महोत्सव निमित्त हिंगोली शहरात वाहतुकीस अडथळा होऊ नये.
तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाहन चालकांनी हिंगोली शहरातील महत्त्वाचे बाजारपेठ इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक, खुराणा पेट्रोल पंप ते महात्मा गांधी चौक, अंबिका टॉकीज ते महात्मा गांधी चौक येथे जाणे असल्यास त्यांनी संत नामदेव पोलीस कवायत मैदान गेट नं. 2 येथे आपले चार चाकी वाहन पार्किंग करूनच शहरात जावे. कोणतेही वाहन रोडवर नो पार्किंग मध्ये सोडू नये जेणेकरून वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होईल, असे कळविण्यात आले आहे.