मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 15 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे आर.बी., प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस.,पर्यवेक्षक कसाब पी.पी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी रोकडे यांनी माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाचनालयातील विविध पुस्तकांचे वाचन केले.
यावेळी सुत्रसंचालन पायघण बी.डी. यांनी केले तर काळे बी.के. यांनी उपस्थित आमचे आभार मानले.