Marmik
Hingoli live क्राईम

दांडेगाव येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडली

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून मंदिराच्या पाठीमागे असलेल्या केळीच्या बागेत फेकून दिल्याची घटना 17 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दांडेगाव येथे महादेव मंदिर आहे. सदरील मंदिर गावाबाहेर असल्याचे समजते. या मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळवून फोडली.

तसेच सदरील दानपेटी मंदिराच्या पाठीमागे केळीच्या बागेत फेकून दिल्याची घटना 17 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. सदरील बाब पोलीस प्रशासनाला समजताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

तसेच श्वानपद्धकही घटनास्थळी पोहोचल्याचे समजते. घटनास्थळावरील दानपेटी वरील फिंगर प्रिंट पथक घेऊ लागल्याचे समजते. घटनेची कसून चौक

या प्रकरणातील चोरट्यांचा अद्याप मागमुस लागला नसून दानपेटीतील रक्कम या अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरील प्रकरणी वृत्त लेखी पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. ऐन नवरात्र उत्सवात सदरील घटना घडल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

Related posts

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फॉवडीसेन नवी दिल्ली व कै. मल्हारी आढाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅण्डल रॅली

Gajanan Jogdand

अजित मगर उचलणार शिव धनुष्य

Gajanan Jogdand

वारंगा वन पर्यटन येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment