मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बु. येथे विनापरवाना गांजाची लागवड केल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. यावरून 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा मारला असता गांजाची 9 झाडे ज्यांचे वजन 4 किलो 600 ग्राम (किंमत अंदाजे 46 हजार रुपये) मिळून आले. याप्रकरणी शेतमालका विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने स्पेशन ड्राईव्ह मध्ये अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी गोपनीय माहिती काढून हद्दीतील जवळा बु. शिवारात इसम नामे नारायण बाजीराव डाढाळे (रा. जवळा बु.) याने त्याच्या स्वतःच्या शेतात गांजाचे विनापरवाना लागवड केल्याची माहिती मिळाली.
यावरून 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी पथकासह छापा मारला असता जवळा बु. शेत शिवारात नारायण बाजीराव डाढाळे याने त्याच्या कापसाच्या शेतात लहान-मोठे
गांजाची नवझाडे वजन 4 किलो 600 ग्रॅम (किंमत 46 हजार रुपये) हे बेकायदेशीर रित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची जोपासना व संवर्धन करताना मिळून आला. त्याच मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर व्यक्तीविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, पोलीस जमादार बालाजी जाधव, गणेश सूर्यवंशी, आसेफ शेख, मारुती गडगिळे, महेश अवचार, इकबाल शेख यांनी केली.