शारदीय नवरात्रोत्सव – पांडुरंग कोतकर
शारदीय नवरात्र उत्सवाचा आज चौथी माळ… आज चौथ्या दिवशी ‘मार्मिक महाराष्ट्र’चे सेनगाव प्रतिनिधी पांडुरंग कोटकर यांनी नांदुरा येथील नवसाला पावणाऱ्या आई सटवाई माता विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट…
हिंगोली तालुक्यातील नांदुरा येथे पुरातन आई सटवाई माता मंदिर आहे.. येथे देवीचे ठाणे कधीपासून आहे याबाबत पूर्ण माहिती नाही.. म्हणून ते पुरातन असावे..
मंदिरात आई सटवाई माता च्या दोन मुर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती पितळेची असून देवीची ख्याती नवसाला पावणारी म्हणून सर्वत्र आहे..
विशेष म्हणजे लग्न होऊन ज्या दांपत्यास मूलबाळ होत नाही अशा दांपत्याची आई सटवाई माता मनोकामना पूर्ण करते..
आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हे दांपत्य नंतर नगर भोजन किंवा त्यांच्या परीने जे जमेल तसे आई सटवाई मातेच्या चरणी वाहून लीन होतात..
ग्रामीण भागात सटवाई माता म्हटले की एखाद्या समाजाची कुलदैवत, ग्रामदैवत असे चित्र डोळ्यासमोर येते नांदुरा येथील आई सटवाई माता ही ही हिंदू समाजाचे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे..
असे असले तरी समाजातील सर्व घटकातील भाविक भक्त आई सटवाई मातेच्या दर्शनासाठी येतात व आपली मनोकामना देवीला सांगतात..
हिंगोली जिल्ह्यातील भाविक भक्तांसह विदर्भ, मराठवाड्यातील भाविक – भक्त आई सटवाई मातेच्या दर्शनासाठी बाराही महिने येथे येतात आणि आपली मनोकामना देवीला सांगतात.. वर्षभरात त्यांचीही मनोकामना आई सटवाई माता पूर्ण करते, अशी आख्यायिका आहे..
विशेष म्हणजे आई सटवा मातेची पुजारी ही महिला आहे. नांदुरा हे गाव हिंगोली पासून 18 ते 22 कि.मी.च्या अंतरावर येते..