Marmik
Hingoli live

शिक्षण विभागाने जिल्हाभरातील शाळा तंबाखूमुक्त कराव्यात; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार –

हिंगोली – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अधयक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागाने जिल्हाभरातील शाळा तंबाखू मुक्त कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. या बैठकीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रत्येक कार्यालय प्रमुखांना प्रत्यक्ष तंबाखू नियंत्रणाबाबत आपल्या स्तरावर काय कार्यवाही केली याबाबत विचारणा केली. आरोग्य व पोलिस विभाग वगळता कोणत्याही विभाग प्रमुखांनी कार्यवाही केली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिक्षण विभागांनी लवकरात लवकर तंबाखू मुक्त शाळा कराव्यात अशा सक्त सूचना देण्यात आल्या. त्याच बरोबर नगर परिषद, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग आदी विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन होत असल्यास 200 रुपये पर्यंत दंड आकरावा व आपले कार्यालय तंबाखूमुक्त असल्याबाबतचे घोषणापत्र तयार करुन आरोग्य विभागास महितीस्तव द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी उपस्थितांना दिल्या.

नगर परिषद व पोलीस विभाग यांनी शाळांच्या आवारातील तंबाखूची विक्री हटविण्याबाबत कार्यवाही करावी, त्याचरोबर पोलिस विभागाने तंबाखू नियंत्रणासाठी केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षास पाठवावा. जेणेकरुन जिल्ह्याचा एकत्रित अहवाल राज्य कार्यालयासाठी पाठविता येईल. तसेच या बैठकीस अनुपस्थित अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यासंबधी सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख तसेच आरोग्य विभागाचे डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. कुणाल देशमुख, कुलदीप केळकर, आनंद साळवे, दिलीप धामणे, धम्मदीप नरवाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगरचे अभिजीत संघई उपस्थित होते.

Related posts

चालत्या ट्रक मधून सुपारीची पोते चोरणारे चोरटे नांदेड येथून जेरबंद; एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

अल्प पावसावर पेरण्या; शेतकऱ्यांचे बियाणे ‘मातीत’!

Gajanan Jogdand

हिंगोली व औंढा नागनाथ येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 11 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment