Marmik
Hingoli live लाइफ स्टाइल

घोटा येथील आई तुळजाभवानीचे जागृत देवस्थान

शारदीय नवरात्रोत्सव – विशेष प्रतिनिधी

शारदीय नवरात्र उत्सवातील आज नववी माळ… नवरात्र उत्सवानिमित्त मार्मिक महाराष्ट्र समूहाने हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गा मातांविषयीची श्रृंखला वाचकांसाठी चालविली… या शृंखलेतील हा शेवटचा भाग.. मार्मिक महाराष्ट्र विशेष प्रतिनिधीने हिंगोली तालुक्यातील घोटा येथील प्रसिद्ध आई तुळजाभवानी मातेविषयीचा घेतलेला हा विशेष वृत्तांत…

हिंगोली तालुक्यातील मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध घोटादेवी येथील आई तुळजाभवानीचे जागृत देवस्थान… नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येथे हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक – भक्त येत असतात…

येथील श्रीस्वामी महाराज यांना आई तुळजाभवानीची मूर्ती प्रकट झाली किंवा त्यांना आई तुळजाभवानीची मूर्ती ही विहिरीत सापडली, अशी आख्यायिका सांगितली जाते…

ज्या विहिरीत आई तुळजाभवानीची मूर्ती सापडली ती विहीर मंदिरापासून 100 कि.मी.च्या अंतरावर असल्याचे सांगितले जाते…

आई तुळजाभवानी मंदिराची स्थापना सन 1957 ला झाली… आई तुळजाभवानी माता घोटा देवी तीर्थक्षेत्र हे नरसी नामदेव तीर्थक्षेत्रापेक्षाही पुढे होते, असे सांगितले जाते..

मात्र, या तीर्थक्षेत्राचा कोणताच विकास न झाल्याने हे तीर्थक्षेत्र पूर्वीपासून जशाला तसेच आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे…

आई तुळजाभवानीची महिमा आगाद असून नवसाला पावणारी देवी म्हणून आई तुळजाभवानीची ख्याती सर्वत्र आहे… आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी घोटा देवी येथे भाविक – भक्तांची मोठी गर्दी होत आहे… आई तुळजाभवानी येथे गुप्तदान मोठ्या प्रमाणात केले जाते असे समजते..

22 ऑक्टोबर रोजी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एक ते दीड लाख भाविक – भक्त घोटा देवी येथे आले होते, असे समजते… मंदिर संस्थान कडून येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती… त्यामुळे मंदिरापासून ते घोटादेवी पाटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या… आलेल्या भाविकांना दीड ते दोन तास उशिराने दर्शन मिळू लागले होते, असे समजते…

नवरात्र उत्सवानिमित्त मार्मिक महाराष्ट्रने वाचकांसाठी शारदीय नवरात्र उत्सव ही शृंखला सुरू केली होती… या शृंखलेत जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत दुर्गामाता आणि देव्याची माहिती आम्ही दिली.. जिल्ह्यात अनेक दुर्गा माता त्यांच्या – त्यांच्या महिमा आणि ख्यातीने प्रसिद्ध आहेत..

हिंगोली येथील काली माता, सात देव्या, 14 देव्या, वडहिवरा येथील कालिका माता दुर्गा , कुरुंदा येथील आई जगदंबा, आंब्याची आई, कुरुमादेवी आदी दुर्गामाता आहेत. तसेच काही समाजांच्या कुलदैवता देखील आहेत आणि त्या प्रसिद्ध देखील आहेत…आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही ही खंत…

Related posts

मीनाक्षी पवार यांनी घेतला हिंगोली आर एफ ओ पदाचा पदभार, वन पर्यटनाला चालना देणार

Santosh Awchar

धार्मिक अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडल्या शिवाय समाजाची प्रगती नाही-प्रा.डाॅ. संभाजी बिरांजे

Santosh Awchar

कौमी एकता क्रिकेट स्पर्धेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने पटकावले विजेतेपद तर बासंबा पोलीस ठाणे संघ ठरला उपविजेता, जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण

Santosh Awchar

Leave a Comment