Marmik
Hingoli live क्राईम

घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले; सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 2 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडून गजाआड केले. या आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 2 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हिंगोली येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बळसोंड परिसरातील रामाकृष्ण कॉलनी मध्ये 9 सप्टेंबर 2023 च्या रात्री फिर्यादी सचिन इडोळे यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने किंमत 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

तसेच 17 सप्टेंबर 2023 रोजी बळसोंड परिसरातील फिर्यादी दत्ता नायक यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेल्या सोन्या – चांदीचे दागिने व नगदी रुपये अशा एकूण 66 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

नमूद दोन्ही घटनेत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे गुन्हे तात्काळ उघड करून गुन्ह्यातील आरोपींना पकडून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या तपास पथकाने सदर घटनास्थळी व परिसरात भेट देऊन तपास केला. तसेच गोपनीय बातमीदार व रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासात कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला.

नमूद गुन्हे ऋषिकेश भागवत टाले व शुभम संतोष टाले (दोन्ही रा. खुडज ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी केल्याबाबत निष्पन्न करून दोन्ही आरोपींना सीताप येणे ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात नमूद आरोपींकडून दुनियात चोरून नेलेला सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं. 439 / 2023 कलम 380, 457 या दुनियातील मुद्देमाल – एक तोळा सोन्याची षटकोनी मनी डोरल्याची पोत (किंमत अंदाजे 36 हजार रुपये), 2 तोळे चांदीचे पायातील जोडवे (किंमत अंदाजे 2 हजार रुपये), 3 तोळे चांदीचे जोडवे (किंमत अंदाजे 1200 रुपये).

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथील गुरनं 457 / 2023 कलम 380, 457 या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल – 5 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे 30 हजार रुपये), एकूण 6 ग्राम सोन्याचे लहान बाळाचे 2 ओम 4 अंगठ्या 1 नथ, 1 कुरुडे 2 कानातील बाळ्या सर्व (किंमत अंदाजे 30 हजार 500 रुपये), एकूण 6 तोळ्याचे चांदीचे लहान बाळाचे दागिने 2 जोड चैन 2 बाळे, 2 बाजूबंद (किंमत अंदाजे 2750 रुपये), असा दोन्ही गुन्ह्यातील मिळून वरील प्रमाणे चोरून नेलेले सोन्या – चांदीचे दागिने किंमत अंदाजे 1 लाख 24 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दीपक पाटील दत्ता नागरे यांनी केली.

Related posts

जवळा शिवारात गांजाची लागवड; हट्टा पोलिसांची कारवाई

Santosh Awchar

भाजयुमूचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार! दोन गोळ्या पाठीत घुसल्या, सरकारी कार्यालयातील सुरक्षा ऐरणीवर!!

Santosh Awchar

शासन आदेशांची ऐशी की तैशी! आठ वर्षे लोटूनही शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी एकाच टेबलाला चिटकून

Santosh Awchar

Leave a Comment