Marmik
Hingoli live क्राईम

ट्रॅक्टर चोरीची फिर्याद देणाराच निघाला 420! कर्ज बुडविण्यासाठी रचला कट

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील ट्रॅक्टर चोरणारा हा ट्रॅक्टरचा मालक निघाला आहे. विशेष म्हणजे सदरील व्यक्तीने फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने मित्रा मार्फत ट्रॅक्टर हेड चोरीचा कट रचला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक व त्याचा मित्र अशा दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

31 ऑक्टोबर 2023 रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे नितीन गौतम इंगोले (वय 33 वर्ष, धंदा शेती, रा. साळवा, ता. कळमनुरी जि. हिंगोली) याने स्वतःचा सोनालिका ट्रॅक्टर हेड ज्याचा पासिंग क्रमांक MH-35-AQ1624 असा असलेला ट्रॅक्टर हेड हा राहत्या घरासमोरून 29 ऑगस्ट 2023 रोजी रात्री चोरी गेल्या संदर्भाने तक्रार दिली होती. या अनुषंगाने आखाडा बाळापुर पोलीस ठाणे येथे भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन केले होते.

3 नोव्हेंबर 2023 रोजी तपास पथकाने सदर गुन्ह्यातील फिर्यादी नितीन गौतम इंगोले (वय 23 वर्ष, धंदा शेती, रा. साळवा ता. कळमनुरी) यास या गुन्ह्या संदर्भाने विचारपूस केली असता फिर्यादीने सदर ट्रॅक्टर हेड हे L&T फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर घेतल्याचे सांगितले.

तसेच उसने वाहतुकीचे पैसे सुद्धा उचलल्याचे सांगितले. पोलीस पथकाने फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता फिर्यादीने उडवा – उडवीची उत्तरे दिली. सदरील बाब पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.

पोलीस पथकाने फिर्यादीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केले असता फिर्यादीने सदर ट्रॅक्टर हेडवरील फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा मित्र नामे शेख अनिस शेख गणी (वय 40 वर्ष, रा. तोफखाना हिंगोली) याच्या मार्फतीने ट्रॅक्टर चोरी करण्यास सांगितले.

तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे सदर ट्रॅक्टर हेड चोरीची खोटी फिर्याद दिल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपी शेख अनिस यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदर ट्रॅक्टर हेड वरील फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्यासाठी व भरलेले डाऊन पेमेंट मिळविण्यासाठी फिर्यादी सोबत संगनमत करून असा कट रचून ट्रॅक्टर हेड चोरी केल्याचे सांगून ट्रॅक्टर हेड काढून दिले.

त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर हेड किंमत अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी नितीन गौतम इंगोले व त्याचा मित्र अनिस शेख गणी (वय 40 वर्ष, रा. तोफखाना हिंगोली) यास ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

सदर आरोपींवरुद्ध पोलीस स्टेशन बाळापुर येथे कलम 420, 120 (ब) प्रमाणे फायनान्स कंपनीची फसवणूक करणे, कारखान्याचे पैसे बुडवणे, तसेच ट्रॅक्टर विकून पुन्हा पैसे मिळविणे अशा कार्यवाहीनिमित्त गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.

Related posts

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

Santosh Awchar

आमदार संतोष बांगर यांचे समर्थन करत इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Santosh Awchar

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment