Marmik
Hingoli live क्राईम

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 4 टवाळखोरांवर दामिनी पथकाकडून कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील शाळांसमोर विनाकारण फिरणाऱ्या फिरणाऱ्या व परिसरात आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एकूण 4 व्यक्तींविरुद्ध दामिनी पथकाकडून कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर तसेच विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वसतिगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, बालउद्यान, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर वर्गातील ठिकाणी व महिला तसेच बालकांबाबत होणाऱ्या

छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली, महिला व बालके यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

तसेच विनाकारण आरडाओरड करणाऱ्या व्यक्तींवर आळा घालून प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे. दामिनी पथकाने वेगवेगळ्या शिकवणी वर्गावर जाऊन व शाळा महाविद्यालय येथे भेटी देऊन मुलींशी संवाद साधला.

त्यांच्या तोंडी तक्रारी ऐकून घेतल्या त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांना कायदेविषयक माहिती देऊन गुड टच, बॅड टच बाबत सविस्तर माहिती देऊन संकटकालीन डायल 112 बाबत माहिती दिली.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस हवलदार सरनाईक, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, पोलीस अंमलदार चंद्रशेखर देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात दिनांक 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 यादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शाळा व इतर 39 महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

हिंगोली शहरातील शाळेसमोर विनाकारण फिरणाऱ्या व आरडा ओरड करून परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एकूण 4 टवाळखोर व्यक्तीवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दामिनी पथकाने अडचणी वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन नं. 800700493 तसेच डायल 112 ची सेवाही सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

सुलदली येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

Gajanan Jogdand

सदस्य संख्या निश्चित ; जिल्हा परिषदेच्या 57 व सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी होणार निवडणूक

Santosh Awchar

सूर्यफूल बहरले!

Gajanan Jogdand

Leave a Comment