मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – गुन्हेगारी कामे करणे, प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणे आदी प्रभावी कामे केल्याने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ग्रामीण, हिंगोली शहर पोलीस ठाणे व कुरुंदा पोलीस ठाणे पहिल्या टॉप 3 मध्ये आली आहेत. या पोलीस ठाण्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय असे प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी कामे करणे, प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणे, लपून छपून सुरू असलेले अवैध धंद्यावर कार्यवाही मोहीम तसेच जनता व पोलीस सुसंवाद अधिकाधिक वाढावा यासाठी विविध उपक्रम, दामिनी पथक पेट्रोलिंग,
भरोसा सेल, पोलीस दीदी / काका उपक्रम, जातीय सलोखा सामाजिक सदभावना वाढीसाठी कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, सतर्क रात्रगस्त व कोंबिंग ऑपरेशन इत्यादींच्या माध्यमातून चोरींच्या घटनांना आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील सर्व 13 ही पोलीस ठाण्यांमध्ये वरील सर्व बाबी व इतर प्रमुख बाबीनुसार प्रभावी कामगिरी भावी यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रत्येक महिन्यात सर्व 13 ही पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून व सर्वंकष बाबींचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप 3 पोलीस ठाण्यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.
सदर योजनेनुसार माहे ऑक्टोबर 2023 या महिन्याच्या मासिक अहवालाचे व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे अवलोकन व मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप 3 पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली.
त्यानुसार सर्वाधिक गुण प्राप्त करून व उत्कृष्ट कामगिरी करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी प्रथम तर हिंगोली शहर पोलीस ठाणे यांनी द्वितीय तसेच कुरुंदा पोलीस ठाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
नमूद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना प्रथम क्रमांकाबद्दल प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक बद्दल हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना प्रशस्तीपत्रक व तृतीय क्रमांक बद्दल कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना प्रशस्तीपत्रक असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.