मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत विशेष बोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन मध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये 6 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अटक वॉरंट मधील एकूण 16 इसमांना ताब्यात घेण्यात आले. तर 15 व्यक्ती विरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला. तसेच जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मार्केट यार्ड परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पाच जुगार यांना ताब्यात घेण्यात आले व जुगारातील 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या इतर कार्यवाही देखील करण्यात आल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध धंद्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील त्याचप्रमाणे चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाच्या वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 7 नोव्हेंबर 2023 च्या रात्री 11 वाजेपासून 8 नोव्हेंबर 2023 च्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे,
पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक रवी
हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे व सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
सदर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 19 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील करार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची घसून तपासणी करण्यात आली.
तसेच सदर मोहिमेत पोलिस ठाणे हिंगोली शहर, कुरुंदा, वसमत शहर, वसमत ग्रामीण, हट्टा, औंढा नागनाथ येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 25 अन्वय 6 गुन्हे दाखल करण्यात आले.
या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्याबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा एकूण 16 अटक वॉरंट मधील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
हद्दपारिचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात हजर मिळून आल्याने 2 व्यक्तीवर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये 1 कार्यवाही करण्यात आली.
अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाणे हिंगोली शहर, बासंबा, हिंगोली ग्रामीण, नरसी नामदेव, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत शहर, हट्टा, आखाडा बाळापूर, कुरुंदा, वसमत ग्रामीण येथे एकूण 15 व्यक्तीविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मार्केट यार्ड परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पाच जुगार यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगारातील 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या इतर कार्यवाही देखील करण्यात आल्या आहेत.