Marmik
Hingoli live News

ऐन दिवाळीत एसटी कडून भाडेवाढ! तिकीट दर वाढवून खाजगी वाहनाने जास्त भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे केले आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशाला ऐन दिवाळीत कात्री लावली आहे. दिवाळी ही कुटुंबासोबत साजरी करण्याची प्रत्येकाची आशा असते. कामासाठी आपले घर, आपले गाव सोडून शहरात गेलेले कुटुंब दिवाळीनिमित्त आपले घर गाठतात; मात्र यंदाच्या दिवाळीत त्यांचा प्रवास खर्च महामंडळाकडून वाढविण्यात आला आहे. 8 ते 26 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाकडून तिकीट दर वाढविण्यात आलेले आहेत. तसेच खाजगी वाहनाने महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा दीडपट अधिक तिकीट दर आकारू नये, असे आदेश दिले आहेत. हे म्हणजे मांजराने डोळे झाकून दूध प्यावे आणि इतर मांजरांनाही बोलवावे असे नाईलाजास्त म्हणावे लागते.

आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात . त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दीड पट पेक्षा अधिक आकारु नये असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. शासनाने दि. 27 ऑक्टोबर, 2021 च्या शासन निर्णयानुसार कमाल भाडे दर निश्चित केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने दि. 8 नोव्हेंबर, 2023 ते 26 नोव्हेंबर, 2023 या कालावधीसाठी भाडेवाढ केलेली आहे. त्यानुसार या कालावधीत खाजगी कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत.

हिंगोली ते मुंबईसाठी साधी बस (3×2) साठी 1149 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 2053 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 2136 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 2265 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते पुणेसाठी साधी बस (3×2) साठी 1105 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1567 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1630 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 1729 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते कोल्हापूर साठी साधी बस (3×2) साठी 1365 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1920 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1998 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 2119 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते नागपूर साठी साधी बस (3×2) साठी 789 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1117 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1164 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 1234 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते इंदौर (वाशिम मार्गे) साठी साधी बस (3×2) साठी 1089 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1543 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1606 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 1702 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते सुरत (औरंगाबाद मार्गे) साठी साधी बस (3×2) साठी 1480 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 2098 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 2182 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 2313 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते औरंगाबाद साठी साधी बस (3×2) साठी 559 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 792 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 823 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 874 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते हैद्राबाद साठी साधी बस (3×2) साठी 922 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1309 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1362 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 1444 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते सोलापूर साठी साधी बस (3×2) साठी 1003 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 1420 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 1480 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 1567 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते अमरावती साठी साधी बस (3×2) साठी 420 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 595 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 619 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 656 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते अकोला साठी साधी बस (3×2) साठी 306 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 435 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 451 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 480 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते वाशिम साठी साधी बस (3×2) साठी 112 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 160 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 165 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 176 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

हिंगोली ते परभणी साठी साधी बस (3×2) साठी 183 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 258 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 268 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 285 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली ते नांदेड साठी साधी बस (3×2) साठी 213 रुपये, वातानुकुलीत (सिट) बससाठी 301 रुपये, नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी 313 रुपये व स्लीपर एसी (टाटा/अशोक लेलँड) साठी 334 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

खाजगी प्रवासी वाहनाने अधिकचे भाडे आकारल्यास हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर किंवा 8275232315 व 7448031669 या व्हॉटसअप क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार दाखल करावी. निश्चित करण्यात आलेले भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात , बसेसमध्ये, कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत.

प्रवास करतांना खाजगी बस वाहनधारकाकडून निश्चित केलेल्या वाहन दरापेक्षा जास्त भाडे दर आकारल्यास तिकीटाचा फोटो, ट्रॅव्हलसचे नाव व बस क्रमांक आणि आपला  मोबाईल नंबर व आपल्या आधार कार्डाचा फोटो वरील ई-मेल व व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

कोंबिंग ऑपरेशन : हिंगोली व कळमनुरी येथील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासणी

Santosh Awchar

हिंगोलीत येणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हाभरात मद्यविक्रीचा महापूर!

Gajanan Jogdand

पुन्हा एक घनमीटर सागवान जप्त! वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांची खरवड येथे कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment