मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजी नगर – येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी मग्रारोहयो अंतर्गत विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. त्यांची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय दलित पॅंथर च्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील तत्कालीन भ्रष्ट गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत व त्यांच्या अधिनस्त भ्रष्ट कर्मचारी व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी मग्रारोहयो अंतर्गत कामात अनियमितता भ्रष्टाचार केला आहे.
सदरील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व शासकीय नियमांचे उल्लंघन करून मगरारोहयोची कामे बोगस व कागदोपत्री केलेली आहेत. सदरील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल कार्यवाही करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती.
त्यावर प्रशासनाकडून जिल्हा परिषद स्तरावर चौकशी समिती नेमून येत्या 10 दिवसात त्यांची चौकशी केली जाईल व आपणास अहवाल देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र महिना उलटून गेल्यानंतरही सदरील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे भारतीय दलित पॅंथर महिला अध्यक्षा मराठवाडा प्रदेश गीताबाई मस्के यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर 6 नोव्हेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण केले जात आहे.
तसेच प्रशासनास निवेदनही देण्यात आले आहे. निवेदनावर भारतीय दलित पॅंथर महिला अध्यक्षा मराठवाडा प्रदेश गीताबाई मस्के यांची स्वाक्षरी आहे.