Marmik
Hingoli live

सोमवारी महिला लोकशाही दिन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  किंवा  तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही  दिन  राबविण्यात येतो.

माहे नोव्हेंबर, 2023 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार,दिनांक  20 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे.  

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत.

यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

Related posts

लोकशाहीचा लोकोत्सव : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी! मतदान क्षेत्रातील कामगारांना 2 ते 3 तासाची सवलत

Gajanan Jogdand

सहज मजा मिळाली सजा! तलवारीने केक कापणे तरुणास भोवले; स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Gajanan Jogdand

मांजा खरेदी – विक्री करणाऱ्या तसेच साठा करणाऱ्या दुकानदारावर होणार कारवाई; विशेष पथकाची स्थापना

Gajanan Jogdand

Leave a Comment