मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – आज 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन. या दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी व जी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत त्यांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालय वापराबाबत विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकवण्यासाठी त्या अनुषंगाने वैयतिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोवर्धन, मेला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, अशाप्रकारे कामे करून गाव हागणदारी मुक्त अधिक (odf plus ) म्हणून घोषित केली जात आहे.
19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही, अशा कुटुंबांना केंद्र शासनाकडून वैयक्तिक शौचालय मागणी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
ज्यांना शौचालय नाही त्यांनी शौचालयाचे नावे ऑनलाईन करणे, शौचालय बांधणे, एका खड्ड्याचे शौचालय बांधले असेल तर दुसऱ्या खड्ड्याचे शौचालय बांधकाम करणे, जेणेकरून नियमित शौचालयाचा वापर करता येईल, तसेच सार्वजनिक जागेवर सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सार्वजनिक शौचालय स्वच्छता राखणे,
तसेच सांडपाणी व घनकचऱ्याची कामे गावात शाश्वत प्रमाणात होणे, तसेच गावातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणे हे सर्व उपक्रम गाव पातळीवर राबवावे.
सदर उपक्रमासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी सर्व गावांमध्ये सूचना दिलेल्या आहेत. जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेचे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवावे.
यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, गावांनी शाश्वत स्वच्छता ठेवावीत, असे आवाहनही जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.