मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत येथे देशी दारू सह 47 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील लपून छपून चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात तसेच चोरी, घरफोडी आदी विरोधात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास विशेष सूचना देऊन आदेशित केलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक नेमण्यात आलेले आहे.
या पथकास माहिती मिळाली की, वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत सोमवार पेठ ते मदिना चौकाकडे जाणाऱ्या रोडवरून आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 21 नोव्हेंबर रोजी छापा टाकला असता आरोपी बुद्धभूषण लक्ष्मण शिकारे हा विना क्रमांक मोटार सायकल वरून देशी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला.
यावेळी पथकाने देशी दारू भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या 180 एम.एल. च्या 72 बॉटल (किंमत अंदाजे 7 हजार 200 रुपये) व एक हिरो होंडा स्प्लेंडर विना क्रमांक असलेली मोटरसायकल (किंमत 40 हजार रुपये) असा एकूण 47 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस शिपाई आकाश टापरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार शेख बाबर, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.