Marmik
News

संविधान दिन: नागरिकांनी संविधान प्रश्नमंजुषा, उद्देशिकेच्या ऑनलाईन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

नवी दिल्ली – 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून संसदीय कामकाज मंत्रालयाने देशातील सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाईन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या  योगदानाचा  सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने,  भारतीय संविधानाचा  स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी , दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस  साजरा केला जातो.

संविधान दिवस साजरा करताना,  संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या  ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यात अधिकाधिक लोक भागिदारी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने दोन वेब पोर्टल्स  कार्यान्वित केली  आहेत.

22अधिकृत भाषा आणि इंग्रजीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन: https://readpreamble.nic.in/ ; ऑनलाइन प्रश्नमंजुषा  (“भारत: लोकशाहीची  जननी”) : https://constitutionquiz.nic.in/पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत आणि यात कोणालाही सहभागी होऊन  सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल.   

प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यम मंचावर  पोस्ट करता येतील.

Related posts

आमदार संतोष बांगर यांनी घेतला डॉक्टर बगडीयाचा खरपूस समाचार, मयताच्या नातेवाईकांकडून पैशांची लुबाडणूक

Santosh Awchar

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक संपन्न; 23 ऑगस्ट रोजी विधानभवन समोर करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन

Gajanan Jogdand

जि. प., पं. स. निवडणूक; आरक्षण निश्चितीसाठी 13 जुलै रोजी सभा

Santosh Awchar

Leave a Comment