मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने हजारो हेक्टर वरील रब्बी पिके बाधित झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगाम जवळपास हातचा गेला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रशासनास दिल्याचे समजते.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. होणाऱ्या पावसाने रब्बी हंगामातील तूर, कापूस, गहू हरभरा, ज्वारी या पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे.
अनेक ठिकाणी वेचणीला आलेला कापूस भिजून तो नाहीसा झाला असून इतर पिकेही मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले रब्बी हंगामातील कापूस, तूर हे पीक वाया गेले आहेत.
इतर पिकेही बाधित झालेले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रशासनास दिले असल्याचे समजते.
- हिंगोली जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित क्षेत्र
- हिंगोली – 12 हजार 348 हेक्टर
- कळमनुरी – 23 हजार 335 हेक्टर
- वसमत – 800 हेक्टर
- औंढा नागनाथ – 17 हजार 371 हेक्टर
- सेनगाव – 25 हजार 548 हेक्टर
- (सदरील आकडेवारी अंदाजीत असून त्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.)