मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ 30 नोव्हेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील चिखली, हिंगोली तालुक्यातील भिरडा, सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके, वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे पोहचली.
यावेळी येथे आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली.
‘आपला संकल्प, विकसित भारत’ या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या संकल्प यात्रेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला.
चिखली, भिरडा, शेगाव खोडके, खांडेगाव येथील नागरिकांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वज्ञरे संवाद साधला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.