Marmik
Hingoli live क्राईम

कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवड

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलीस दलात माहेनोव्हेंबर मध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे छायाचित्र असलेले बॅनर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे. तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

गुन्हे उघड – यामध्ये स्थानिक भूमी शाखा येथे कार्यरत उपविभाग वसमत पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी माहे नोव्हेंबर 2023 मध्ये दरोडा तयारी कलम 399 भादवी 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये एक, कलम 379 भादवि चे तीन गुन्हे तसेच कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा नुसार 6 आरोपीकडून सहा तलवार जप्त करून कार्यवाही केली. एमपीडीएस अॅक्ट नुसार दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 10 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध धंद्याविरुद्ध दारूबंदी 6 कार्यवाही तर जुगाराविरुद्ध 4 कार्यवाही केली. तसेच कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे 3 कार्यवाही केली. कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे एक कार्यवाही व इतर चार कार्यवाही केली.

सदर स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत उपविभाग वसमत पथकाने गुन्हे डीक्टेशन विभागात प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणून नमूद महिन्यात गुड डिक्टेशन या विभागात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, चालक पोलीस शिपाई तुषार ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

गुन्हे निर्गती – यामध्ये औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी माहे नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हे निर्गती केली. ज्याची टक्केवारी 41 टक्के आहे. गुन्हे निर्गती विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणून नमूद महिन्यात गुन्हे निर्गती या विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे व पोलीस अंमलदार पंजाबराव थिटे यांची निवड करण्यात आली आहे.

मुद्देमाल निर्गती – यामध्ये आखाडा बाळापूर पोलीस ठाणे यांनी माहे नोव्हेंबर 2023 मध्ये पोलीस ठाण्याला विविध गुन्ह्यात जप्त मुद्देमाला पैकी 7.56% मुद्देमाल निर्गती केली म्हणून मुद्देमालनिर्गती या विभागात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व पोलिस अंमलदार राजू पाईकराव यांची निवड करण्यात आली.

अपराध सिद्धी – यामध्ये आखाडा बाळापूर पोलीस ठाणे यांनी नमूद महिन्यात त्यांच्या पोलिस ठाणे अंतर्गत न्यायालयातून निकाल लागलेल्या सर्व प्रकारात शिक्षा झाली असून अपराध सिद्धीचे प्रमाण 72 टक्के आहे. अपराध सिद्धी या विभागात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व पोलीस अंमलदार जितेंद्र खिल्लारे महाराष्ट्र पोलीस शिपाई कोंडामंगल यांची निवड करण्यात आली.

सीसीटीएनएस डाटा एन्ट्री – यामध्ये बासंबा पोलीस ठाणे यांनी नमूद महिन्यात सीसीटीएनएस मध्ये डाटा एन्ट्री प्रकारात गुन्ह्यातील कागदपत्र जलद गतीने व यशस्वीरित्या भरले. त्याचे प्रमाण 70 टक्के आहे. म्हणून नमूद महिन्यात अपराध सिद्धी या विभागात बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, पोलीस उपनिरीक्षक संजय केंद्रे, पोलीस अंमलदार इंगोले यांची निवड करण्यात आली.

समन्स वॉरंट बजावणी – यामध्ये नमूद महिन्यात नरसी नामदेव पोलीस ठाणे यांनी समन्स वॉरंट बजावणी यात अजामीनपात्र वॉरंट बजावणी 100 टक्के, जामीनपात्र वॉरंट व समन्स बजावणी 100% केली आहे. म्हणून नमूद महिन्यात समन्स वॉरंट बजावणी या विभागात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरगोजे व पोलिस अंमलदार शिरफुले यांची निवड करण्यात आली.

मालमत्ता हस्तगत – यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद महिन्यात जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाला पैकी 8 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. म्हणून नमूद महिन्यात मालमत्ता हस्तगत या विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, चापोशी तुषार ठाकरे यांची निवड करण्यात आली.

प्रतिबंधक कार्यवाही – गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी नमूद महिन्यात प्रतिबंधक कार्यवाही 92% केली. म्हणून नमूद महिन्यात प्रतिबंधक कार्यवाही या विभागात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे यांची निवड करण्यात आली.

वरील प्रमाणे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलात विविध विभागात उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांची विभागनिहाय निवड करण्यात आली असून त्यांचे छायाचित्र असलेले बॅनर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.

Related posts

खाजगी दवाखान्यांनी संशयित डेंगू व हिवतापाचा रुग्ण शासकीय यंत्रणेस कळवावा – जिल्हा हिवताप अधिकारी

Santosh Awchar

विशेष मोहीम : न्यायालयाकडून प्राप्त 46 अजामीन पात्र वॉरंटची बजावणी, वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Santosh Awchar

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत “हर घर झेंडा” उपक्रम

Santosh Awchar

Leave a Comment