मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
डोंबिवली – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार किंवा हार – तुरे न घालता वही – पेन अर्पण करण्यात आले.
सदरील वही व पेन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. हा उपक्रम डोंबिवली येथील लोढा पलावा बुद्धिस्ट फेडरेशन यांच्याकडून या फेडरेशनचे पदाधिकारी, मार्मिक महाराष्ट्र समूहाचे सॅटॅलाइट संपादक संतोष आठवले यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्व येथील लोढा पलावा बुद्धिस्ट फेडरेशन यांच्यावतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अथवाहार तुरे न घालता श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकानी सोबत वही व पेन आणावी, असे आवाहन करण्यात आले होते.
यास येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हार – तुरे न आणता वही व पेन आणून विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केले 5 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला. आज म्हणजे 6 डिसेंबर रोजी रात्री 12:30 वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदरील वही व पेन गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप केली जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे. असे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.
यावेळी लोढा पलावा बुद्धिस्ट फेडरेशनचे संस्थापक, फाउंडेशनचे पदाधिकारी, मार्मिक महाराष्ट्र समूहाचे सॅटॅलाइट संपादक संतोष आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी सदरील उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मनोज यादव सुधीर, कोतकर, पत्रकार जी.डी. कदम, रवि गायकवाड, चित्रकार प्रेम कदम, विठ्ठल बनसोडे, ऋषभ जाधव, स्वप्निल तांबे, देवेंद्र गायकवाड, आनंद कांबळे, उज्वल घरडे, शिवा बनसोडे, संदेश मगरे यांच्यासह लोढा हेवन निळजे डोंबिवली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.