Marmik
दर्पण

वृद्धांवरील गुन्हेगारी 9 टक्क्यांनी वाढली!

गणेश पिटेकर

केंद्र सरकारच्या सेंट्रल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2022 सालच्या गुन्हेगारी संबंधी आकडेवारी जाहीर केले आहे. त्यात वृद्धांवरील गुन्हेगारी संबंधित आकडेवारी 9 टक्क्यांनी वाढली आहे. मोठ्यांचा आदर शिकवणाऱ्या समाजात इतका बदल झाला आहे. याकडे आपण डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे.

घरातील वयस्कर मंडळी महत्त्वाची असतात. त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप काही असत. त्यांचा आदर करायला हवा असं म्हणणारा वर्ग आता उरला कि संपला असा प्रश्न पडू लागला आहे. हे सर्व आठवण्यामागे दोन घटना आहेत. एक पुणे येथील कोथरूड भागातील एका सोसायटीत 80 वर्षां च्या वृद्ध व्यक्तीने राहत्या फ्लॅट मधून उडी घेऊन आत्महत्या केली.

दुसर्‍या घटनेत केंद्र सरकारच्या सेंट्रल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2022 सालच्या गुन्हेगारी संबंधी आकडेवारी जाहीर केले आहे. त्यात वृद्धांवरील गुन्हेगारी संबंधित आकडेवारी 9 टक्क्यांनी वाढली आहे.

पुण्यातील वृद्धाच्या आत्महत्येमागे एकाकीपण आणि आजार हे कारण होते. त्यांना तीन मुले आहेत. दोघे परदेशात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. एक मुंबईत आहे. ते जर आपल्या मुलांबरोबर राहिले असते तर एवढा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला नसता आणि शेवटचा काळ निवांत घालवला असता.

आपल्या देशात वृद्धाविरोधात गुन्हे मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. मोठ्यांचा आदर शिकवणाऱ्या समाजात इतका बदल झाला आहे. याकडे आपण डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे.

लहान असताना मुलांना जिवापाड जपून त्यांची स्वप्न पूर्ण करायचे. त्यांचा संसार उभा करण्यास हातभार लावायचा. आणि नातवंडांबरोबर खेळायचे दिवस असताना त्यांना अडगळीत टाकल जात. समाजाची नैतिक मूल्यांची चौकट कोसळत चालली की काय? तसे पण ती कोसळून नष्ट झालीच आहे.

समाजात वृद्धाबाबत जो काही बदल दिसत आहे. त्याला ते स्वतः जबाबदार आहेत का? वयाबरोबर व्यक्तीच्या स्वभावात फरक पडत जातो. तो समजून न घेता आई-बाबा फारच चिडचिडे झाले आहेत.. त्यांचे वागणे पटत नाही.. पण त्यांच्या मनातलं समजून न घेता सर्व दुषणं देणं किती योग्य? शेवटच्या काळात तरी मुलांनी आर्थिक, मानसिक आणि सर्वच बाजूने साथ देणं आवश्यक आहे.

पूर्वार्ध

Related posts

विवाह संस्कृती कोणत्या दिशेने?..!

Mule

हिंगोली लोकसभा : मतदानाचा टक्का घसरण्यास कारण की…

Gajanan Jogdand

घ्या हाणून ! हळदीला ‘जीआय’ नाही

Gajanan Jogdand

Leave a Comment