Marmik
क्राईम

युवकावर कोयत्याने वार; दोघा दोषींना 3 वर्ष सश्रम कारावास

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील जिजामाता नगर येथील युवकास जिवे मारण्याच्या उद्देशाने एका आरोपीने कोयत्याने वार केला तसेच दुसऱ्या आरोपीने पीडित युवकाच्या उजव्या डोळ्यावर तलवारीच्या मुठीने मारल्या प्रकरणी हिंगोली येथील अप्पर सत्र न्यायाधीश आरबी लोखंडे यांनी दोघा आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

हिंगोली शहरातील जिजामाता नगर येथील रहिवासी फिर्यादी नितीन प्रकाश घोडके याने दिलेल्या तक्रारीवरून 7 ऑगस्ट 2021 रोजी रात्रीच्या वेळी जेवण करून त्याच्या मित्रासोबत चौकात (शतपावली) फिरत असताना आरोपी रोहन आनंदराव लबडे व राहुल भगवान खिल्लारे याने फिर्यादीच्या उजव्या कपाळावर, डोळ्याच्या वर जीवे मारण्याच्या उद्देशाने

लोखंडी कोयत्याने वार केला व राहुल खिल्लारे यांनी त्याच्या हातात असलेल्या तलवारीच्या मुठीने उजव्या डोळ्यावर मारले अशा फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरनं 249 / 2021 कलम 307, 324, 294, 506, 34 भादविसह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. जी. केनेकर यांनी केला.

सदर प्रकरण हे हिंगोली येथील अप्पर सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्यासमोर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणास न्यायालयात सत्र खटला क्र. 01 / 2022 देण्यात आला.

या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील एस.डी. कुटे व एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले.

तसेच तपास कार्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख फिरोज व मपोहे सुनिता एस. शिंदे शहर पोलीस ठाणे हिंगोली (कोर्ट पैरवी) यांनी सहकार्य केले.

या प्रकरणात हिंगोली येथील अप्पर सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी 11 डिसेंबर 2023 रोजी सत्र खटला क्रमांक 01/2022 महाराष्ट्र शासन विरुद्ध रोहन लबडे या प्रकरणात आरोपी रोहन आनंदराव लबडे व राहुल भगवान खिल्लारे दोन्ही रा. हिंगोली यास या गुन्ह्यात दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Related posts

52 तास पत्त्यावर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कुरुंदा पोलिसांची कारवाई; 6 लाख 58 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांना पाहून घटनास्थळावरून 11 जणांनी ठोकली धूम!

Santosh Awchar

मोटार सायकल चोरणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद! 17 मोटरसायकल जप्त

Santosh Awchar

52 ताश पत्त्यावर चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Santosh Awchar

Leave a Comment