Marmik
क्राईम

पुसेगाव येथील 5 जण 6 महिन्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील सतत गुन्हे करणारे 5 जण हिंगोली जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. तसे हद्दपारचे आदेश हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नरसी नामदेव शहरात राहणारे सराईत गुन्हेगार गजानन महादू ठोके (वय 40 वर्ष), सचिन सखाराम ठोके (वय 28 वर्ष), राहुल महादू ठोके (वय 34 वर्ष), संदीप महादू ठोके (वय 30 वर्ष) व राजू तुळशीराम ठोके (वय 32 वर्षे) सर्व रा. पुसेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली यांच्याविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्धचे 3 गुन्हे दाखल आहेत.

सदरील गुन्हेगार सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या शरीराविरुद्ध धोका उत्पन्न होत असल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले होते.

यावरून नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे यांनी नमूद आरोपीविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 वरील 5 आरोपींना आजपासून पुढील 6 महिन्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्या बाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

हिंगोलीत पुन्हा गांजा पकडला; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Santosh Awchar

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 10 व्हाट्सअप वापरकर्त्यांना नोटीस

Santosh Awchar

गोळीबार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस

Gajanan Jogdand

Leave a Comment