Marmik
News लाइफ स्टाइल

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गणेश पिटेकर :-

पुणे – नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली यांच्यावतीने पुणे शहरातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव 16 ते 24 डिसेंबर असा राहणार आहे. महोत्सवास प्रसिद्ध कवी कुमार विश्वास लेखक विक्रम संपत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.

वाचणाऱ्यांसाठी पुण्यातील पुस्तक महोत्सववाचन ही स्वतः ला समृद्ध करणारी प्रक्रिया आहे. मग वाचक त्याला हवी असलेले पुस्तके शोधत असतो. वर्तमान काळातील गुंतागुंत वाचनातून कळू शकते. हे लिहिण्यामागे निमित्त ठरलंय पुणे पुस्तक महोत्सव. गेल्या काही दिवसांपासुन शहरात जोरदार तयारी सूरू होती. या महोत्सवाचे आयोजन नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका आणि फर्ग्युसन महाविद्यालय आहे. मुलांसाठी खास पुस्तकां स्टॉल ही थाटले आहे. विविध कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे.

प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. पुणेकरांचा पहिल्याच दिवशी उत्साह पाहायला मिळाला. हा महोत्सव १६ डिसेंबर रोजी सुरु झाला आहे. तो २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजे आठ दिवस.

कवी कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत यासह अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. यात डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी या संशोधन संस्थांनी देखील आपले महत्त्वाचे संशोधन ग्रंथ विक्री करीत ठेवले आहे.

असं म्हटल जात वाचाल तर वाचाल ! ग्रंथ माणसाला खूप काही शिकून जातात. फक्त त्याची संगत लागायला हवी. महोत्सवात दोनशे स्टॉल लावले गेले आहेत. महोत्सव वाचकांशिवाय पूर्ण होऊ शकते नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कानडी यासह इतर भाषेतील पुस्तके आहेत. पुस्तकांशिवाय समाज ही कल्पना करवत नाही.

Related posts

हिंद प्रेसला लागली अचानक आग; गांधी चौकात नागरिकांचा एकच गोंधळ!

Santosh Awchar

गुरुकुल लिटल होप स्कूलच्या आवाहनास पालक, नागरिकांचा प्रतिसाद; अनाथ आश्रमातील बालकांना करणार शालेय साहित्याचे वाटप

Gajanan Jogdand

सिमेंट काँक्रिटचे रस्ते झाले, नाल्या कधी होणार?

Gajanan Jogdand

Leave a Comment