Marmik
News

मुक्त विद्यापीठाचा ‘पुणे पुस्तक महोत्सवात’ सहभाग

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले, गणेश पिटेकर :-

नाशिक, पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट) मार्फत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजीत केलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सव’ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सहभाग घेतला असून, तेथे मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा स्टॉल उभारला होता. यामध्ये मुक्त विद्यापीठाने तयार केलेले उपयुक्त असे सर्वप्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता उपयुक्त पुस्तके, त्याचप्रमाणे वाणिज्य, आरोग्य, कृषी आणि इतर विषयांच्या पुस्तकांचा देखील समावेश आहे.

या प्रदर्शनामध्ये मुक्त विद्यापीठाकडून चारुदास पंडित यांची व्यंगचित्रावर कार्यशाळा, टॅलेंट हंट ग्रुप सादरीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रथमच मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘माझं विद्यापीठ माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 22 विद्यार्थ्यांचे प्रदर्शित केलेल्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, धावपटू कविता राऊत, डॉ. रवींद्र सिंगल, संजय बेलसरे, ललिता बाबर, उमेश खांडबहाले, शिक्षणतज्ञ भाऊ चासकर, रमेश घोलप, संजय बेलसरे, तुळशीदास भोईटे, उद्योजक पंडित खांदवे यांच्यासह अनेक क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांना मानाचे स्थान देण्यात आले.

या महोत्सवात मुक्त विद्यापीठामार्फत ‘फैजल’ हा काश्मिरी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.   

मुक्त विद्यापीठाच्या स्टॉलला युवक, युवती आणि जेष्ठ नागरीक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पुणे पुस्तक महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आपल्याकडे पुस्तक किंवा ग्रंथ यांना गुरु मानले जाते. वाचाल तर वाचाल असा कानमंत्रही थोरामोठ्यांकडून दिला जातो. त्यामुळे अशा महोत्सवामुळे वाचन संस्कृतीची वाट सुकर होते, असेही त्यांनी नमूद केले. या भव्य आयोजनाबद्दल त्यांनी संयोजकांचे कौतूक केले.

पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस घडतो आणि माणूस घडवण्याची ही प्रक्रिया या पुढेही या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सुरू राहायला पाहीजे. दिल्ली, जयपूर, कलकत्ता येथील पुस्तक महोत्सवाच्या तोडीचा हा महोत्सव असल्याचे ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी यावेळी नमूद केले.

पुस्तक प्रदर्शनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम आयोजीत केलेले आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाचे विशेष म्हणजे या महोत्सवात चौथा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. एकाच पुस्तकातील समान परिच्छेद तीस सेकंदात वाचण्याचा हा विक्रम असून, ११ हजार ४२ नागरिकांनी या विक्रमात सहभाग घेतला.

पुणे पुस्तक महोत्सवाला आत्तापर्यंत तीन लाख नागरिकांनी भेट दिली. यामध्ये युवक युवती तसेच जेष्ठ नागरिक यांची संख्या लक्षणीय आहे. या महोत्सवातील प्रकाशनच्या स्टॉलवर विविध प्रकारचे पुस्तके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होऊ लागली होती. वाचणाऱ्यांची संख्या कमी होते अशी ओरड होत असताना अगदी उलट दृश्य पुणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सध्या पाहायला मिळाले.

अवघ्या ५ दिवसात 5 कोटींपेक्षा जास्त रकमेची पुस्तक खरेदी करण्यात आली असून, ३० हजारांपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी आणि 3 लाख पेक्षा जास्त नागरिक भेट देतात हीच या महोत्सवाच्या यशाची पोचपावती म्हणावी लागेल.

सदर प्रदर्शनास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. पी. डी. पाटील कुलपती डी. वाय. पाटील कॉलेज, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. संजय चाकणे, डॉ. आदित्य अभ्यंकर, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. अनिल कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, ग्रंथपाल मधुकर शेवाळे, डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. प्रकाश बर्वे, डॉ. सुरेंद्र पाटोळे, प्रा. माधव पळशीकर, प्रा. नागार्जुन वाडेकर, डॉ. नितीन ठोके, डॉ. शाम पाटील, सुनिल विभांडीक, संतोष साबळे, गणेश चव्हाण, सचिन कटारे, किरण राऊत आदी उपस्थित होते. ‘पुणे पुस्तक महोत्सवाच्या’ मुख्य संयोजनाची जबाबदारी राजेश पांडे यशस्वीपणे पार पाडली.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशेष सन्मान

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने यामध्ये सहभाग घेऊन, विद्यापीठाच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Related posts

लिंबाळा प्रवाह येथे स्वच्छतेचे तीन तेरा! नाल्या बुजल्या, सांडपाणी रस्त्यावर; गावाचे आरोग्य धोक्यात

Santosh Awchar

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत बँक खाते आधार संलग्न करावेत

Santosh Awchar

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडे मृत पावू लागली! सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार

Gajanan Jogdand

Leave a Comment