Marmik
News

टिटवाळा येथे शिक्षण युवा जनाधिकार संघटनेचे शिबिर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-

डोंबिवली – येथील टिटवाळा येथे शिक्षण युवा जन अधिकार संघटनेचे कार्यकर्ता शिबिर पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन शिक्षण कायद्यातील तरतुदी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या शिबिरास प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण तज्ञ, लेखक शिवाजीराव राऊत हे होते तर आरटीआय कार्यकर्ते एडवोकेट कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी लेखाधिकारी कॉम्रेड कोमस्कर, डोंबिवली रिक्षा युनियनचे अध्यक्ष विलास शेलार, विलास शेळके, दीनानाथ चौधरी हे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन शिक्षण कायद्यातील तरतुदी याविषयी उपस्थित नागरिक पालक व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

शिक्षण हक्क कायद्यातील 25% राखीव जागा या संदर्भात आता नवीन वर्षाचे 2024 – 25 चे अर्ज विषयी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. तसेच संविधानातील नागरिकांचे हक्क व कर्तव्य याबद्दलही अनेक गोष्टी नागरिकांसमोर मांडल्या.

तसेच आरटीआय माहितीचा अधिकार कायदा 2005 माहिती मिळवण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी तसेच अर्जाचा नमुना याबाबतही उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना सांगितले.

कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख, ठाणे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रामदास वाईंगडे, अंबरनाथ कार्यकारिणीचे निशांत धोंडे, रेखा यादव व इतर कमिटी सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमास अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली येथील विभाग प्रमुख, कार्यकर्ते, नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

रस्ता सुरक्षा अभियानात एकास रस्ता चिरडले; अभियानाला लागला रक्ताचा धब्बा

Gajanan Jogdand

महाराष्ट्र व देशाचे नाव उंचविण्यासाठी अध‍िक परिश्रम करेन – कुस्तीपटू श्रावणी लव्हटे

Gajanan Jogdand

महापरिनिर्वाण दिन : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार- तुरे न घालता वही – पेन अर्पण

Gajanan Jogdand

Leave a Comment