Marmik
Bhoomika दर्पण

आशावादी राहून करा स्वप्न पूर्ण

गणेश पिटेकर

आज २०२३ या वर्षाचा रविवार हा शेवटचा दिवस. बरेच लोक थिर्टी फर्स्टची तयारी करत असतील… या वर्षाने अनेकांना अनुभव समृद्ध केले असेल…काहींचे संकल्प सिद्धीस गेले असतील… काहींनी फक्त कागदावर वर्षभरात काय करायचे ते लिहिले. मात्र त्याची अंमलबजावणी करणे राहूनच गेले. खूप काही करायचे होते राव. पण ते काही माझ्याकडून झालेच नाही.असा पश्चताप येणाऱ्या वर्षात करण्याची वेळ येऊ नये. यासाठी आजचं डायरी घ्या. त्यावर पूर्ण नियोजन लिहून काढा. आता त्याचे टप्पे पाडा. सहा – सहा महिने असे तुम्ही करू शकता…

मात्र हे सर्व करीत असताना आपण किती उत्साही राहतो? ठरवलेले ध्येय / पाहिलेल्या स्वप्नासाठी किती धडपड करतो हेही महत्त्वाचे असते. जी झोपू देत नाही त्याला स्वप्न म्हणतात. आपल्या बाबतीत असं कधी घडलं आहे का? सतत स्वतःला चार्ज ठेवा. अवती – भवती खूपच गढूळ वातावरण आहे. त्याच्याशी लढण्यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक निरोगी राहणं आवश्यक आहे. त्या करिता व्यायाम, योगा आणि ध्यानधारणा करणं आवश्यक आहे.

एक लक्षात ठेवले पाहिजे की सर्वांना दिवसातील २४ तास मिळतात. मग काहीच लोक का यशस्वी होतात ? प्रत्येकाचे आजी-आजोबा, आई-वडील सकाळी लवकर उठत. तुम्ही काय करता? लवकर उठता की उशीरा? जर याचं उत्तर नाही असेल तर उद्या पासून लवकर उठण्याचा संकल्प करा. आयुष्य वेगवेगळया रंगांनी भरलेले आहे. ते असंच व्यर्थ जाऊ देऊ नका. तर लक्षात ठेवा तुमचं सकाळचं ‘रुटीन’ असायला हवे. म्हणजे ‘मॉर्निंग रुटीन’.

यश म्हणजे केवळ आयुष्य नव्हे.अपयश पण आयुष्याचा भाग असतो. चौकस राहा. वेगवेगळ्या गोष्टी सतत शिका. स्वतः मधील जिज्ञासा कधीही मरू देऊ नका. यातून तुम्ही नेहमी शिकण्याच्या ‘मोड’मध्ये राहा. याबाबतीत चित्रकार, लेखिका माधुरी पुरंदरे आपल्या एका मुलाखतीत खूप महत्त्वाचं आयुष्यातील तत्त्व सांगून जातात. त्या म्हणतात, अखेर पर्यंत यश न लाभलेले प्रतिभावंतही असतात. कित्येकदा आयुष्यामध्ये सगळं विपरित घडून सुद्धा स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासन जगणारी साधी-साधी माणसं सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात, ती पाहायला मुलांनी शिकलं पाहिजे.

Related posts

हळूहळू होऊ लागलाय कल्याणकारी राज्ये ‘संकल्पनेचा’ लिलाव!!

Gajanan Jogdand

नद्यांना हलक्यात किती घेणार?….

Gajanan Jogdand

पत्रकारितेतील हरवत चाललेली मूल्य

Gajanan Jogdand

Leave a Comment