Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar News

ट्रक, टँकर चालकांचा संप : ‘उद्योग नगरी’वर मोठं संकट! रस्त्यावर जाणवू शकतो शुकशुकाट

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजी नगर – ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ ट्रक टँकर चालकांचा संप सुरू झाला आहे. परिणामी मराठवाड्यात इंधन टंचाई जाणवू लागली असून उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगरावर मोठे संकट उभे राहिले आहे. इंधनाअभावी या महानगरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू शकतो इथपर्यंत परिस्थिती ओढवली आहे.

केंद्र सरकारच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ देशभरात ट्रक व टँकर चालकांचा संप सुरू झाला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस असून इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप कोरडेठाक पडले आहेत. मराठवाड्यात इंधन टंचाईचा परिणाम जाणवू लागला असून खाजगी वाहतूक कोलमडली आहे.

महाराष्ट्राची उद्योग नगरी म्हणून नावारूपास येत असलेल्या छत्रपती संभाजी नगरात इंधन टंचाईचे मोठे गंभीर संकट उभे राहिले असून इंधनाभावी महानगरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळू लागला आहे. शहरातील जवळपास सर्व कंपन्यांचे पेट्रोल पंप हे ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाल्याने बंद करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचेही जवळपास असेच चित्र असून अनेक पेट्रोल पंप हे इंधनाअभावी बंद करण्यात आले आहेत.

इंधन टंचाईचा सामना ‘लाल परीला’ही करावा लागत असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीची सेवा ही खंडित होण्याची शक्यता आहे.

इंधन न मिळाल्यास उद्योग नगरी असलेल्या छत्रपती संभाजी नगरातील जनजीवन विस्कळीत होऊन महानगरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंधन टंचाईचा त्रास उद्योग व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.

काही पेट्रोल पंपावर आजच्या दिवसाचा इंधन साठा

‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या जाचक तरतुदींच्या विरोधात ट्रक व टँकर चालकांचा संप सुरू आहे. याचा परिणाम इंधन साठ्यावर झाला असून अनेक पेट्रोल पंप कोरडेठाक पडले आहेत. छत्रपती संभाजी नगरातील सर्वच पेट्रोल पंप बंद असून हरसुल भागातील जळगाव महामार्गावर असलेल्या हर्सूल टी पॉईंट येथील पेट्रोल पंपाची दररोजची मागणी 50 हजार लिटरची असते. सुरू असलेल्या संपामुळे अनेक नागरिकांनी योग्य खबरदारी म्हणून आपल्या गाड्यांमध्ये जास्तीचा इंधन साठा करून घेतलेला आहे. हर्सूल टी पॉइंट येथील पेट्रोल पंपावर 43 हजार लिटर पेट्रोल आणि 24 600 डिझेल हे विक्री झाले प्रत्येक दिवशी वीस हजार पेट्रोल विक्री होते. सध्या 30 हजार लिटर एवढासाठा या पेट्रोल पंपावर शिल्लक आहे. तो आज सायंकाळपर्यंत संपण्याची शक्यता आहे, अशी माहिती या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अनिल खरात यांनी दिली.

Related posts

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! 14 मोटरसायकल सह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

वाटर फिल्टर करू लागले सरपंच, ग्रामसेवकांची पैशांची ‘तहान’ दूर! भानखेडा उपसरपंचाचे सेनगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Gajanan Jogdand

पूर्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा; कोणत्याही क्षणी येलदरी, सिद्धेश्वर धरणांतून पाणी सुटू शकते

Santosh Awchar

Leave a Comment