मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजी नगर – मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगरात शुक्रवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने रस्त्यावर चिकचिक तेवढी झाली. तसेच काही प्रमाणात थंडीत वाढ झाली.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या व महाराष्ट्रात उद्योग नगरी म्हणून नावारूपास येत असलेल्या छत्रपती संभाजी नगरात 5 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
मराठवाड्यावर मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग निर्माण होत आहेत. छत्रपती संभाजी नगरातील सिडको, हडको, गारखेडा परिसर, चिकलठाणा आदी भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या यामुळे थंडीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
या पावसात दरम्यान सोसाट्याचा वारा किंवा ढगांचा गडगडाट असे काही झाले नाही. झालेल्या पावसाने शहरातील विविध सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर चिकचिक तेवढी झाली. त्याचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागला.