मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – ‘WE’ अर्थात WE FOR ENVIRONMENT! या संस्थेतर्फे २०२४ या नववर्षाची सुरुवात नाद आराधना या अतिशय वेगळ्या पद्धतीने केली. वैश्विक /सामाजिक/कौटुंबिक /शारीरिक आणि मानसिक, पर्यावरणाचे संतुलन कसे ठेवले पाहिजे यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
यंदा दुसऱ्या वर्षी ही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने सातत्य राखले आहे. नाद हा जन्मापासूनच त्या व्यक्तीसोबत येतो. पहिला नाद म्हणजे त्या नवागतांचे रडणे! खरे तर गायन/वादन/कीर्तन/भजन/आणि इतर संगीतात बऱ्याच आवडीचे. मुळात नाद हा एक महत्वपूर्ण आणि अविभाज्य हिस्सा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये..
तेव्हा याचे भान आणि काळाची गरज ओळखून ‘WE’ या संस्थेने शून्य स्पेस या संस्थेच्या सह संचालिका आणि सुप्रसिद्ध ध्वनी चिकित्सक प्रिया नंदकुमार अय्यर यांनी विवेचन करीत या नादाचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो हे उपस्थितांना सांगितले. संगीत हे औषधाप्रमाणेच उपकारक आहे, असे सांगताना त्यांनी याचा मन आणि बुद्धी यावर होणार दूरगामी परिणाम होतो आणि वेदना, यातना दुःख कमी करायला हे सहाय्यकारी ठरते, असे त्यांनी सांगितले.
बलवंत वाचनालय औरंगपुरा येथे संपन्न झालेल्या या संगीतमय कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘WE’ च्या अध्यक्ष मेघना बडजाते यांनी केले. शारीरिक आणि मानसिक समस्या संगीताच्या माध्यमातून जीवन जगण्याची इच्छा वाढवतात, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा भक्ती गीतने श्रीमती प्रीति सुराणा यांनी केली. तसेच ‘व्हिसल’ कलाकार कैलाश पटेल यांनी शिट्टी वाजवून मंत्रमुग्ध केले तर डॉ. गणेश कुळकर्णी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास नमिता बूनलिया , बाबुराव दिघुले, ,डॉ. मयुरी लाहोटी, स्नेहल वाणी, मोनाली दिकोंडवार पडळकर , रवी बोडके, शोभा बोडके डॉ. पी एम दरख,
चंद्रकांत छाजेड, डॉ.मनिषा चर्जन, डॉ विवेक चर्जेन, रुपाली कुलकर्णी , राधिका कविश्वर, सुलभा भागवत, संगिता जोशी, अनिल कोनार्डे, अनघा कोनार्डे, अपूर्वा दायमा, डॉ.गोकुळ लाहोटी, डॉ. प्रिती फटाले , मनोज पाटणी, आकाश जोशी, मोना सेठी, सुनील सेठी, मोस्मी सोनी श्रेष्ठ ,आदित्य सोनी, सुरज दुरुगकर, मयूर ठोले, डॉ. सम्मति ठोले व इतर मान्यवर उपस्थित होते.
भक्ती ,संगीत आणि ध्यान धारणा असा अनोखा संगमामधून या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन अध्यक्षा मेघना बडजाते, निरज बडजाते, विजय शर्मा, कमल पहाडे, द्यानेश्वर वाघ यानी केले. प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष बूनलिया यांनी केले.