Marmik
News

गुरुकुल लिटल होप स्कूलच्या आवाहनास पालक, नागरिकांचा प्रतिसाद; अनाथ आश्रमातील बालकांना करणार शालेय साहित्याचे वाटप

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-

डोंबिवली – येथील गुरुकुल लिटल होप स्कूल कडून अनाथ आश्रमातील बालकांना शालेय साहित्य व उबदार कपडे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना व परिसरातील नागरिकांना आपापल्या परीने त्यांनी साहित्य द्यावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास पालक व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

डोंबिवली भागात रिता हेमंत मारू यांनी 2008 यावर्षी स्थापन केलेल्या गुरुकुल लिटल होप स्कूल कडून शिक्षणासह सामाजिक दायित्व जपण्याचा वारसा आहे. शाळेकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते.

यंदा ही शाळेच्या वतीने अनाथाश्रमातील बालकांना वही, पुस्तके, पेन, शालेय बॅग, ब्लॅंकेट, खाण्याचे साहित्य कपडे आदी देण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास पालक व नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आपापल्या परीने जसे जमेल तसे साहित्य शाळेत आणून दिले.

13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या दरम्यान नागरिकांनी हे साहित्य आणून दिले. यावेळी गुरुकुल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि गुरुकुल ब्राईट वर्ड स्कूलचे अध्यक्ष कमल कुमार पात्रा, गुरुकुल ट्रस्टचे विश्वस्त हेमंत मारू, प्राचार्य खुशबू हेमंत मारू यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेत आणून दिलेले हे साहित्य दोन दिवसात अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. शाळेच्या या उपक्रमाचे डोंबिवली शहरासह ठाणे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

Related posts

25 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी येणार हिंगोलीत

Santosh Awchar

पिक विम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे पेनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन

Jagan

सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

Santosh Awchar

Leave a Comment