मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – नेहमी सामजिक कार्यात व जनकल्याणकारी कार्यात अग्रेसर असलेल्या व वर्षभर विविध नवनविन उपक्रम राबविणा-या जायंटस ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर प्राइडची 2024 साठी नुतन कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष पदी मंजु भारतीया, सचिव पदी प्रिती सारडा, उपाध्यक्ष पदी रिझवाना अमीन, प्रिती झंवर तर कोषाध्यक्ष पदी शिल्पा गुंडेवार यांची निवड करण्यात आली. तसेच संचालक पदी निलेश पहाडे, आशिष सुराणा, हरीष अग्रवाल, शितल अग्रवाल, अशिमा जैस्वाल, वैशाली चितलांगी, निशा भाटीया, प्रेरणा टीब्रेवाल यांची निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष रितेश अग्रवाल यांनी नुतन कार्यकारणीकडे आपला पदभार दिला. यामध्ये सल्लागार पदी अमित सोनी , गोपाल सारडा यांची नेमणूक करण्यात आली.
या कार्यकारणीची निवड शैलेश चितलांगी आणि माजी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
जायंट्स प्राइड ग्रुप तर्फे रक्तदान शिविर ,वृक्षारोपण, अन्नदान, महिला सबलीकरण, हनुमान जयंती निमित्त खुलबाद रस्त्याचे स्वछ्ता अभियान , सैनिकां सोबत रक्षाबन्धन असे विविध सामजिक उपक्रम पुर्ण वर्षभर घेतले जातात.