मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्यातील सारोळा येथील एका व्यक्तीकडून गावठी पिस्तल अग्निशस्त्र ताब्यात घेऊन सदरील व्यक्तीवर कार्यवाही केली आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिले यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक काम करीत होते.
23 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे दिपक दुधाटे (रा. सारोळा, ता. वसमत) याचे जवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल असून तो सध्या त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन इसम नामे दिपक राजेश दुधाटे (वय २१ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. सारोळा, ता. वसमत, जि. हिंगोली) यास ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने अवैधरीत्या गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगीत असल्याचे कबुल करून एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बॅरल व ट्रिगरयुक्त (किंमती २५ हजार रूपयाचे) काढुन दिले.
नमुद इसमास गावठी पिस्टल (अग्नीशरत्र) सह ताब्यात घेवुन पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सुध्दा अवैध हत्यार बाळगणा-यांविरूध्द तिव्र मोहिम करून, कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली.