मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला सरपंचाच्या पतीस 5 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील तक्रारदार त्यांच्या वडीलांचा वटकळी येथील ग्रामपंचायतचा एमआरजीएस या योजनेमध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी पात्र लाभार्थी म्हणून ठराव मंजूर करून दिला म्हणून त्या मंजूर ठरावाचे व सिंचन विहिरीचे पुढील कामात सहकार्य करण्यासाठी शेकुराव नारायण शिंदे, (खाजगी इसम, महिला सरपंच वटकळी गाव यांचे पती, राहणार वटकळी, ता. सेनगाव , जिल्हा – हिंगोली) यांनी तक्रारदार यास पंचासमक्ष 5 हजार रुपये लाचेची मागणी करून 5 हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाणे सेनगाव जि. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
डॉ. राजकुमार शिंदे , (पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड) रमेशकुमार स्वामी (अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी अनिल कटके (पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो हिंगोली) हे होत
विनायक जाधव, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर (पोलीस निरीक्षक),सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, विजय शुक्ला, पोह/ ज्ञानेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, रवि वरणे, चापोह अकबर, मपोना/ योगीता अवचार, पोकॉ/शिवाजी वाघ सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली यांनी सापळा कारवाई पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक जाधव (अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली) हे करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास डॉ.राजकुमार शिंदे (पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. नांदेड परिक्षेत्र, नांदेड) मो. नं. – 9623999944अनिल कटके (पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो हिंगोली)मो. नं. – 9870221379 कार्यालय दुरध्वनी – 02456-223055@ टोल फ्रि क्रं. 1064 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.