मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजी नगर – येथील दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळाव्यात म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढला. लेखी आश्वासनाशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत, असा निर्धार ा मोर्चेकर्यांनी केला. त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आडविण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.
छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला सहकारी बँक, अजिंठा को-ऑपरेटिव्ह बँक, तसेच मलकापूर को-ऑपरेटिव्ह बँक बँका दिवाळखोरीत निघाल्याने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी या बँकांचे खाते गोठवले आहे.
सदरील बँकांमध्ये छत्रपती संभाजी नगर येथील लाखो नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. नागरिकांनी मोठ्या मेहनतीने त्यांच्या घामाचा पैसा मोठ्या विश्वासाने या बँकांमध्ये ठेवला होता.
मात्र सदरील बँका दिवाळखोरीत निघाल्याने त्यांच्या ठेवी बुडतात की काय या भीतीने तसेच आपला घामाचा पैसा मिळविण्यासाठी या नागरिकांनी 30 जानेवारी रोजी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन विराट मोर्चा काढला मोर्चेकरांनी जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार केला होता.
सदरील मोर्चेकरी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्याआधी विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. सदरील प्रवेशद्वारावर मोर्चेकरांना आडवील्याचे समजते;मात्र मोर्चेकरेही आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून आले.