Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – येथील राष्ट्रवादी भवन मुख्य कार्यालय येथे 31 जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मेळाव्यास शहरातील अनेक सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी ,सामाजिक कार्यकर्त्यांनी, विभिन्न सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी उपस्थिती दर्शविली. आम्ही सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यरत राहू असे आश्वासन दिले.

सदर मेळाव्याचे आयोजन रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष शेख अकबर यांनी केले होते. अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रफिक यांनी सर्व उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष शेख अनवर तसेच सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष शुभम साळवे उपस्थित होते.

Related posts

पी. यु. जैन यांची जयंती उत्साहात

Gajanan Jogdand

जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी व मंदिराच्या माजी अध्यक्ष, सचिव विश्वस्तांचा सत्कार

Gajanan Jogdand

जैन इंजिनियर्स सोसायटीतर्फ स्केलअप आयबीआयझेड 2.0 स्टार्टअप स्पर्धेचे भव्य ग्रॅन्ड फिनालेचे आयोजन

Gajanan Jogdand

Leave a Comment