मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जल जीवन मिशन अंतर्गत हिंगोली पंचायत समिती यांच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी आदर्श महाविद्याल हिंगोली येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धा कार्यक्रमात प्रथमता गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन हिंगोली पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश बोथीकर व उप प्राचार्य रमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंदा बेले यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विलास आघाव, उप प्राचार्य रमेश दळवी, प्रा. अनिल शास्त्री, विस्तार अधिकारी तुपेवाड, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ शामसुंदर मस्के, गट समन्वयक नंदकिशोर आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये कनिष्ठ विभागातून प्रथम- विशाल कांबळे, द्वितीय- रेणुका मांदळे, तृतीय -श्रुती कल्याणकर , तसेच वरिष्ठ विभागातून प्रथम -वैष्णवी सातव, द्वितीय -चेतन साठे, तृतीय- विश्वभूषण गायकवाड हे निवडून आले. सदरील स्पर्धक हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. पी बी जावळे, प्रा. रामराव पोले , प्रा. तुकाराम आडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश मंगनाळे यांनी केले तर आनंदा बेले व नंदकिशोर आठवले यांनी उपस्थित आमचे आभार मानले.